अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य

राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफ च्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही मदत खालील प्रमाणे राहील

  • जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
  • बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
  • बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
  • ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल
आपली प्रतिक्रिया द्या