महाराष्ट्रातील फळे व त्यांचे गुणधर्म

5849

dr-namrata-bharambe>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे

आपण बाजारात गेलो की फळविक्रेत्याकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळे दिसतात. अशा बहुरंगी, बहुढंगी विविध चवीच्या फळांमधून कोणती फळे निवडावीत? कोणत्या फळांमधून कोणती पोषक द्रव्ये शरीराला मिळतात? या साऱ्या शंकांच निरसन करण्याच हा प्रयत्न.

– आजकाल बहुतांश फळे ही वर्षभर जरी उपलब्ध असली, तरी फळांच्या हंगामानुसार येणारीच फळे प्राधान्यांनी खावी. जसे उन्हाळ्यात आंबा, जांभूळ, हिवाळ्यात पपई, स्ट्रॉबेरी इ.

– नेहमी आपल्य़ा प्रदेशात पिकणारी फळे खावीत. कारण देश, काळ, ऋतू नुसार ती फळे आपल्याशी साधर्म्य़ राखतात. जसे हिमालयीन प्रदेशात होणाऱ्या सफरचंदापेक्षा महाराष्ट्रातील आंबा, फणस, चिकू, संत्री आपल्याला जास्त पोषक ठरतात.

– फळे निवडताना संकरीत फळे निवडण्यापेक्षा देशी फळे निवडा. कारण संकरीत वाण हे जेनेटिकली मॉडीफाइड असतात आणि त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम हे हळूहळू सिद्ध होत आहेत.

महाराष्ट्रामध्ये फळांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातील काही फळांचे गुणधर्म आपण बघूयात.

anjir-th१. अंजीर – महाराष्ट्रातील पुणे व आसपासचा परिसर हा अंजीरसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला अंजीर आपल्याला बाजारात दिसतात. अंजीर हे उत्तम प्रमाणात पोटॅशिअमचा स्त्रोत आहे, म्हणूनच हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अंजीर खाल्ले पाहिजे. ज्यांच्या आहारात Junk किंवा processed फूड जास्त असते. त्यांच्या आहारात असणारी पोटॅशिअची कमतरता अंजीर खाल्याने भरुन निघते.

banana-th२. केळी – महाराष्ट्रात “केळ्यांची राजधानी” म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे. बहुतांशवेळा केळी वजन वाढवते म्हणून किंवा मधुमेह असल्याकारणाने टाळले जाते. पण केळ्यामध्ये असणारे फायबर हे त्यातील नैसर्गिक साखर सावकाशपणे रक्तात शोषण्यास मदत करते. म्हणूनच सकाळी व्यायामाआधी sustained energy supply म्हणून केळे हा उत्तम पर्याय आहे. तसेच केळे हे उत्तम probiotic food असल्यामुळे विविध पोषक द्रव्यांचे शोषण योग्य प्रकारे होण्यास मदत होते.

grapes-th३. द्राक्षे – महाराष्ट्रातील नाशिक शहर हे द्राक्षांसाठी सर्वदूत आहे. द्राक्षांमध्ये polyphenol नावाचे antioxident असते, जे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाला प्रतिबंध करते. द्राक्षांच्या सालीमध्ये असलेले resveratrol हे अनियंत्रित मधुमेहामुळे होणाऱ्या neuropathy व ratinopathy पासून संरक्षण करते.

mango-th४. आंबा – संपूर्ण महाराष्ट्रात आंबा पिकतो परंतु रत्नागिरीचा हापूस हा त्याच्या अप्रतिम चवीमुळे पार सातासमुद्रापार जाऊन पोहोचला आहे. १ कप आंबा रोजच्या गरजेच्या २५ टक्के ‘अ’ जीनवसत्वाचा पुरवठा करते. त्यामुळे आंबा डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतो. कैरीचे पन्हे हे उष्माघातापासून बचाव करते.

orange-th५. संत्री– नागपूर शहर हे संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. संत्र्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचा समतोल राखण्याचे काम संत्री करतात. यासोबतच संत्र्यांमध्ये असणारे फायबर हे बद्धकोष्ठ दूर करते.

strawberry-th६. स्ट्रॉबेरी – महाबळेश्वर हे थंड हवेच्या ठिकाणांमध्ये प्रसिद्ध आहे तसेच ते स्ट्रॉबेरीसाठी पण प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरीच्या लाल रंगामध्ये असलेले anthocyanin हे शरीरात साठलेल्या चरबीचे विघटन करते. त्यामुळे स्थूल किंवा कॅलरी कॉन्शिअस लोक बेधडकपणे याचा आस्वाद घेऊ शकतात.

(क्रमश:)

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected]

फोन क्र. ९८२०२१५७९६

आपली प्रतिक्रिया द्या