घरकामगारांसाठी सरकारने आर्थिक तरतूद करावी

20

सामना ऑनलाईन । नागपूर

महाराष्ट्र घरकामगार युनियनतर्फे नागपूर येथे नुकतेच घरकामगार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ कायदा सुधारणा या मुद्यावर कार्यकर्तांनी आपली मते व्यक्त केली. तसेच यावेळी राज्य सरकारने २००९ मध्ये संमत केलेला घरेलू कामगार कल्याण मंडळ कायद्यात कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे. यावर मान्यवरांनी आपले विचार मांडले.

यावेळी घरकामगार नोंदणीचे काम जिल्हा कामगांर आयुक्तांना अतिरिक्त वाटत असल्याने घरकामगार नोंदणी संथ गतीने सुरू असली तरी ती समाधानकारक नाही यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच कामगारांच्या मुलांचे शिक्षण अपघात विमा, मातृत्व लाभासाठी सरकारने विशेष तरतूद करावी अशी मागणी संघटनेने केली.

आपली प्रतिक्रिया द्या