बारावीच्या गुणपत्रिकेवर यापुढे ‘नापास’ शेरा नाही

383

यंदापासून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा शेरा काढून टाकण्यात आला आहे. नापासऐवजी ‘पुनर्परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा यापुढे देण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेपासून तसेच जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये होणाऱया पुरवणी परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून त्याबाबतचा अध्यादेश गुरुवारी जारी करण्यात आला. श्रेणी विषयासह एक किंवा दोन विषयांत नापास होणाऱया विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत नापासऐवजी पुनर्परीक्षेसाठी पात्र असा शेरा असणार आहे. त्याचबरोबर तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयांत नापास होणाऱया विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत तसेच पुरवणी परीक्षेतही दोन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांत नापास होणाऱया विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत नापासऐवजी पुनर्परीक्षेस पात्र असा शेरा असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या