जनादेश महायुतीला!

292
Mumbai: Maharashtra BJP President Chandrakant Patil with party leaders Sudhir Mungantiwar, Ashish Shelar and Girish Mahajan interact with media after meeting Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari, in Mumbai, Thursday, Nov. 7, 2019. (PTI Photo/Shashank Parade) (PTI11_7_2019_000069B)

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला अतिशय स्पष्ट जनादेश दिलेला आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे, असे सांगतानाच सत्ता स्थापन करण्यास नेहमीपेक्षा मात्र जास्त वेळ लागत असल्याची कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

‘वर्षा’ बंगल्यावर बुधवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून भाजपचे शिष्टमंडळ आज चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या शिष्टमंडळात सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन व आशीष शेलार या नेत्यांचा समावेश होता.
पाटील पत्रकार परिषदेत…

  • राज्यातील आताच्या राजकीय स्थितीत कोणते कायदेशीर मुद्दे आहेत याची चर्चा करण्यासाठी आम्ही राज्यपाल कोश्यारी यांना भेटलो.
  • महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीचे ब्रिफ्रिंग करण्यासाठी आम्ही गेलो होतो. राज्यात सध्या नेमके काय चालले आहे यावर खूप सविस्तर चर्चा झाली.
  • राज्यपालांशी झालेल्या चर्चेच्या आधारे पुढे काय करायचे याचा निर्णय करणार आहोत.
आपली प्रतिक्रिया द्या