सामाजिक न्याय विभागाच्या योजना व निधीचाविकास आराखडा सादर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

556

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाव आवश्यक तो निधी अनुसूचितजातीच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी विभागाच्या अधिकाऱयांनी या योजनांचा व निधीचा सर्वंकष असा विकास आराखडा त्वरीत सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज  दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालीसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागची आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे, आमदार रवींद्र वायकर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले कीविभागाच्या विविध योजना राबविण्यासाठी ज्या काही अडीअडचणी येतील त्या विभागाच्या अधिकाऱयांनी सादरकराव्यात त्याप्रमाणे त्या अडचणी सोडविण्यासाठी शासन त्वरीत निर्णय घेईल. विशेषतः शिष्यवृत्ती योजना, स्वाधार योजना, वसतीगृहे आणि निवासी शाळा, रमाई आवास घरकुल (शहरी व ग्रामीण) योजना दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्यायोजना यावर नव्याने काय करता येईल. याबाबतही सविस्तर अहवाल सादरकरावा.  विभागाच्या अंतर्गतयेणाऱया विविध महामंडळांना येणाऱया अडचणी सोडविण्यात येतील व त्यांना आवश्यक असणारी मदतही करण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या