एन 95 मास्क आता 49 रुपयांत विकणे सक्तीचे

कोरोना विषाणूशी लढताना सर्वसामान्यांना चांगल्या दर्जाचे एन 95 मास्क आजपासून किमान 19 ते 49 रुपयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मास्कच्या किंमतीबाबत शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दरांप्रमाणेच दुकानदारांना एन 95 मास्कची विक्री करावी लागणार आहे. आता मास्क जादा दराने विकल्यास दुकानदारांवर कठोर कारवाई होईल.

कोरोनाच्या संकटाचा फायदा घेत अनेक विक्रेत्यांनी मास्क व सॅनिटायझरची काळ्या बाजारात विक्री सुरू केली होती. मास्क अतिशय चढय़ा भावाने विकले जात होते. त्यामुळे मास्क व सॅनिटायझरच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. या किंमती निश्चित केल्यावर त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आजच्या तारखेपासून सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार विक्रेत्यांना मास्कची विक्री करावी लागेल. मास्कचा दर्जा व त्याची निश्चित केलेली कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील.

आपली प्रतिक्रिया द्या