राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण

2396

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. भाजपची रविवारी कोअर कमिटीची बैठक होणार असून या बैठकीत हे निमंत्रण स्वीकारायचे की नाही याबाबत निर्णय होणार असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप महायुतीला जनतेचे बहुमत दिले आहे. भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र, शिवसेनेशी भाजपने महायुती करतेवेळी पद व जबाबदारीचे समान वाटप करण्याचा निर्णय झाला होता. मात्र आता भाजपने अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद नाकारल्याने महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. 9 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेचा भंग झाला असून 8 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी फडणवीस यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या