शहरी नक्षलवाद्यांचा देशभर हिंसाचाराचा कट

फाईल फोटो

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

शहरी नक्षलवाद्यांच्या विचारांशी असहमती किंवा मतभेद असल्यामुळे कारवाई केलेली नाही तर ठोस पुरावे असल्यामुळेच अटक केली आहे अशी ठाम भूमिका आज महाराष्ट्र पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. नक्षलवाद्यांनी देशभर अराजक माजविण्याचा, हिंसाचार घडविण्याचा कट रचला आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना स्थानबद्ध नको तर पोलीस कोठडी द्यावी अशी मागणीही प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आली आहे.

28 ऑगस्टला पुणे पोलिसांनी देशभरात धाडी टाकून बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचे ‘थिंक टँक’ असलेल्या पाच नक्षलवाद्यांना अटक केली. पुण्यातील एलगार परिषद आणि भीमा-कोरेगाव येथील दंगलप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, तेलंग कवी वरवरा राव, अरुण फरेरा आणि वर्नन गोन्साल्विस यांना अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने या पाच शहरी नक्षलवाद्यांना अटक करण्याऐवजी घरातच नजरकैदेत ठेवावे, 6 सप्टेंबरपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले होते.

सीलबंद लिफाफ्यात पुरावे सादर

या पाच शहरी नक्षलवाद्यांविरुद्ध ठोस पुरावे आहेत असे महाराष्ट्र पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यासंबंधीचे पुरावे बंद लिफाफ्यात सादर केले आहेत.

The counter affidavit, filed by the Maharashtra police on a plea of historian Romila Thapar and four others challenging the arrest of these activists in connection with the Bhima-Koregaon violence case alleged that they were planning to carry out violence in the country and ambush the security forces.