राहुल गांधी 10 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र, हरयाणात प्रचार करणार

343
rahul-gandhi

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी 10 ते 19 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र आणि हरयाणात प्रचारफेऱ्या काढणार आहेत. सध्या ते केरळच्या दौऱ्यावर आहेत. कर्नाटक आणि केरळला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 766 वर सध्या प्रवासबंदी लादण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर, वायनाड येथे सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते आज वायनाडमध्ये दाखल झाले.

आपली प्रतिक्रिया द्या