पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांना सरकारी चाप! भरारी पथके नजर ठेवणार

494

राज्य सरकारने खासगी रुग्णालयांना वाजवी शुल्क आकारण्याचे निर्देश दिल्यानंतरही या रुग्णालयांकडून रुग्णांची अक्षरश: पिळवणूक केली जाते. या रुग्णालयांना चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना त्यांच्या स्तरावर भरारी पथके नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ही भरारी पथके रुग्णालयांकडून रुग्णांना वाजवी दरात दर्जेदार उपचार मिळत आहेत की नाहीत याची पाहणी करणार आहेत. तसे न झाल्यास रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

रुग्णालयांकडून वाजवी शुल्क आकारण्यात येते की नाही हे पाहण्यासाठी भरारी पथकांच्या कार्यवाहीबाबत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने 21 मे रोजी अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय 23 मे रोजी घेण्यात आला आहे. 30 जून रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर निाqश्चत केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अंमलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही खासगी रुग्णालयांकडून लूट सुरूच असल्याच्या तक्रारी येत आहेत. हे रोखण्यासाठी भरारी पथके नेमण्यात येत आहेत.

भरारी पथके काय करणार?
शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही याची खातरजमा.
खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी केली जाईल.
रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी ती तपासली जाणार
आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा मिळते का याची तपासणी.

आपली प्रतिक्रिया द्या