सीमाभाग केंद्रशासित करा; पटोले यांची मागणी

सीमावर्ती भागासंदर्भात सर्वेच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. निकाल लागेपर्यंत हा भाग  केंद्रशासित व्हावा, अशी मागणी होत होती.  केंद्रशासित प्रदेश करण्यासंदर्भात केंद्र सरकारने मध्यस्थी केली पाहिजे. हा वाद संपेपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला जावा असे ऑफिडेव्हीट केंद्र सरकारने सर्वेच्च न्यायालयात सादर करण्याची गरज असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा ठराव मांडला.  सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना नेहमीच टार्गेट केले जाते. त्यामुळे त्यांचे जगणे असहाय्य झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या वतीने सातत्याने हा ठराव मांडण्यासाठी आग्रह होता. सरकारने आज ठराव मांडल्यामुळे एकमताने तो मंजूर करण्यासंदर्भात आम्ही विरोधकांनी भूमिका घेतली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांना सांगितले.