आदर्श, विशालवर मदार; मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाचे चमू जाहीर 

मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाची ‘महाराष्ट्र केसरी’ अजिंक्य स्पर्धेसाठी वार्षिक कुस्ती चाचणी महाराष्ट्र व्यायामशाळा, कुर्ला, मुंबई येथे पार पडली. या चाचणीतून उपनगर जिह्यातून गादी विभागासाठी आदर्श दिनेश गुंड, तर माती विभागातून विशाल शिवाजी बनकर ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी झुंजणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष पहिलवान संपत साळुंखे, सरचिटणीस विनायक गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली खजिनदार सतीश कदम, उपाध्यक्ष किसन मदने, दगडू पारटे, चिटणीस महादेव ढमाळ, तानाजी राजगे, नंदू मांढरे, सदस्य मुकुंद कांचन, दिलीप सरक, जगदीश गायकवाड,जगन्नाथ कोळपे यांनी विशेष परिश्रम घेतले.

गादी विभागः विक्रम वसंत हगवणे (57 किलो),सौरभ दत्तात्रय हगवणे (61किलो), शुभम दीपक ढमाळ (65  किलो), मंदार सतीश कदम (70  किलो), पांडुरंग श्रीमंत वाघमोडे (74  किलो ), सुमित पोपट मरगजे (79  किलो), राम विश्वास धायगुडे (86  किलो), शुभम श्रीधर  गव्हाणे (92 किलो), अक्षय संभाजी गरुड (97  किलो ), महाराष्ट्र केसरी – आदर्श दिनेश गुंड (गादी विभाग ).

माती विभाग ः ओमकार सुमित जगदाळे (57  किलो ), अक्षय अंकुश करे (61 किलो), रितीक संजय पाचपुते(65 किलो), शुभम यशवंत जमदाडे (70 किलो), सूरज राजेंद्र वीरकर (74 किलो ), शुभमा दत्तात्रय गाढवे (79 किलो ), गोविंद विलास दिडवाघ (86 किलो ), सारंग चंद्रकांत सोनटक्के (92  किलो ), संग्राम धनाजी साळुंखे (97  किलो), महाराष्ट्र केसरी – विशाल शिवाजी बनकर (माती विभाग).

आपली प्रतिक्रिया द्या