Bisleri चे पाणी पिऊन घसा सुजला, बाटली पाहिल्यानंतर बसला धक्का

बाटलीबंद पाणी हे शुद्ध असते असा सर्वसामान्यांचा समज आहे. बिसलेरी म्हटले की शुद्ध पाणी असे समीकरण रुढ झाले आहे, मात्र याच बिसलेकीचे पाणी प्यायल्याने नागपूरच्या एका मुलीचा घसा सुजला आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी बिसलेरीच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधला असून त्यांच्याकडे असलेल्या बाटलीतील पाण्याचा नमुना बिसलेरीच्या प्रतिनिधीने तपासणीसाठी नेला आहे. मुनघाटे यांनी बिसलेरीविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे म्हटले आहे.

आशिष मुनघाटे असे तक्रारदार व्यक्तीचे नााव असून ते नागपूरचे रहिवासी आहेत. गेल्या शनिवारी त्यांनी बिस्लेरीच्या अर्ध्या लिटरच्या चार पाण्याच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. शनिवारी त्या बाटल्यांपैकी एका बाटलीतील पाणी त्यांची मुलगी प्यायली होती. अवघ्या तासाभरात तिचा घसा खवखवायला लागला. पाण्यामुळे घसा खवखवत असेल असं तिला वाटलं नव्हतं, ज्यामुळे तिने पुन्हा एकदा त्या बाटलीतील पाणी प्यायलं होतं. यानंतर तिचा घसा सुजला आणि तो दुखायला लागला.  तिला दुसऱ्या दिवशी तिला दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनी तिच्या घशाला संसर्ग झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी या मुलीला काही औषधे दिली असून आता तिची प्रकृती चांगली आहे.

मुनघाटे यांनी घरी परततल्यावर बिसरेलीच्या बाटल्या नीट पाहिल्या. यावेळी त्यांना बाटलीतील पाण्यात काहीतरी तरंगताना दिसले. पाण्यात घाण तरंगताना दिसल्यावर त्यांनी इतरही बाटल्या पाहिल्या. त्या बाटल्यांमध्येही घाण असल्याचे मुनघाटे यांना दिसून आले. याबाबतची तक्रार करण्यासाठी त्यांनी बिसलेरीच्या ग्राहक सेवेशी फोनवरून संपर्क साधला होता. बराचवेळानंतर मुनघाटे यांचा ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क झाला. बिसलेरीने त्यांच्या प्रतिनिधीला पाण्याचा नमुना तपासण्यासाठी मुनघाटे यांच्या घरी पाठवले होते. हा प्रतिनिधी पाण्याचा नमुना घेऊन गेला आहे. , त्यांनाही बाटलीतील पाणी घाणेरडे दिसले त्यानंतर तो प्रतिनिधी बाटलीतील पाण्याचा नमुना सोबत घेऊन गेला. शिवाय एवढ्या मोठ्या कंपनीकडून असे चूक होऊ शकते असे बेजबाबदार उत्तर देण्यात आले. बिस्लेरी सारख्या मोठ्या ब्रॅण्डकडून असे उत्तर मिळणे गंभीर आहे. कंपनीची ग्राहक सेवाही फार वाईट असून आता आशिष मुनघाटे बिसलेरीविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे.