1 / 7

लोणावळा-खंडाळा - सह्याद्रीच्या घाटमाथावरील वनराई आणि धबधब्यांच्या अनोख्या सौंदर्याने सजलेले लोणावळा-खंडाळा मन मोहून टाकतात.

भीमाशंकर - पुणे जिल्ह्यात असणारे भीमाशंकर हे ठिकाण पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वात सुंदर. घनदाट जंगल आणि वैविध्यपूर्ण प्राणी, तसचे तीर्थक्षेत्राचा आनंद या ठिकाणी मिळतो.

सापुतारा - महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नाशिकपासून ८०-८५ किमी असणाऱ्या सातपुडा पर्वतरांगेत आहे सापुतारा हे ठिकाण. येथील गीरा धबधबा आणि कलाकारांचे खेडे प्रेक्षणीय आहे.

पाचगणी - सातारा जिल्ह्यातील आणि महाबळेश्वरपासून २० किमीच्या अंतरावर असणारे पाचगणी. खोल दऱ्या, डोंगरांवरून कोसळणारे धबधबे, हिरवळ आणि पाचगणीच्या प्रसिद्ध गुफा ही प्रेक्षणीय स्थळे.
आपली प्रतिक्रिया द्या