उमेदवारीचे आमिष दाखवत बलात्कार, अटक झालेल्या मनसे विभागप्रमुखाचा राजीनामा

मनसेचा मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचा विभागप्रमुख वृशांत वडके याला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी देतो असे सांगून 42 वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याचा वडके याच्यावर आरोप आहे. पीडित महिलेने व्ही.पी.रोड पोलिसांत वडकेविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे वडके याच्याविरोधात भादंवि कलम 376, 500 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वडके याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. वडके याने 7 सप्टेंबर रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लेखी पत्र लिहून आपण विभागाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे कळवले आहे.