राज्याच्या हितासाठी शिवसेनेचीच गरज! अमोल किर्तीकर 

राज्याच्या हितासाठी शिवसेनेचीच खरी गरज असल्याचे शिवसेना उपनेते आणि युवासेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल किर्तीकर यांनी म्हटले आहे. ते आसूद येथे बोलत होते. दापोली विधानसभा मतदार संघातील दापोली तालुक्यात भगवा सप्ताह सुरू आहे. ही संकल्पना अमोल कीर्तिकर यांची आहे. या भगव्या सप्ताहाला शिवसैनिक, शिवप्रेमी, शिवसेनेवर मनापासून प्रेम करणाऱ्या जनतेचा उत्स्फुर्त पाठिंबा मिळताना दिसतोय.

भगवा सप्ताहाचा हर्णे जिल्हा परिषद गटाचा मेळावा आसूद येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना किर्तीकर यांनी शिवसेना वाढीसाठी आणि बळकटीसाठी तन मन धन अर्पून काम करावे असे आवाहन केले. भगवा सप्ताहाचे औचित्य साधत मुरूड येथील विश्राम बोवणे, बाळकृष्ण मोरे, आसूद येथील अर्जुन बांद्रे या ज्येष्ठ नागरिक तसेच जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुर्यकांत दळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई तसेच तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर हजर होते. याशिवाय राज्यस्तरावर खो-खोमध्ये नाव गाजवणारा गिम्हवणे दुबळेवाडीचा खोखोपटू निहार दुबळे आणि गुणवंत विद्र्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी तालुका संघटक शांताराम पवार, विधानसभा संघटक, गोरेगाव मंबईचे राजू पाध्ये, उपविभाग प्रमुख ,गोरेगाव मुंबईचे लक्ष्मण नेहरकर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, तालुका महिला संघटिका वंदना धोपट, माजी उपसभापती अनंत बांद्रे,शहर युवा अधिकारी प्रसाद दरिपकर ,तालुका युवती अधिकारी कुमारी लाजरी पोळेकर,शहर युवती सेना अधिकारी कुमारी सायली गावडे,हर्णे जिल्हा परिषद गट उपतालुकाप्रमुख, विवेक भावे , विभागप्रमुख नईम हुनेरकर, विभाग संघटक विनोद पतंगे उपविभाग प्रमुख नारायण खळे ,गिम्हवणे विभागप्रमुख अनंत ऊर्फ रामू साळवी, विभाग संघटक विजय बागकर, उपविभाग प्रमुख विजय जाधव, अयुब मसुरकर गिम्हवणे शाखाप्रमुख अजित दुबळे,वणंदचे प्रकाश धोत्रे,आसुदचे विजय बांद्रे, उप शाखा प्रमुख रघुनाथ रेवाळे, महिला शाखाप्रमुख वनिता शिगवण,मुरूडचे कमलाकर घडसे,कर्देचे रविंद्र मुकनाक,सालदुरेचे निवेदन शेवडे,पालंदेचे आशिष नरवणकर आदी उपस्थित होते.