एटीएम घोटाळय़ात महाराष्ट्र अव्वल! देशभरात 980 घटना

54
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एटीएम घोटाळ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात याचे सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. 2018-19 मध्ये देशभरात एटीएम घोटाळ्याच्या 980 घटना घडल्या. त्यात 21.4 कोटी रुपयांची लूट झाली. यामध्ये महाराष्ट्रात 233 गुन्हे घडले आणि 4.8 कोटी रुपयांचा चुना लागला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत माहिती दिली. एटीएम फोडणे, चोरून नेणे, बनावट एटीएम कार्ड वापरणे, स्किमरवरून डाटाचोरी आदी प्रकारे हे गुन्हे घडत आहेत. 2017-18 मध्ये एटीएम घोटाळ्याच्या देशात 911 घटना घडल्या होत्या. त्यात 65.3 कोटी रुपये लुटले गेले. 2017-18 लाही महाराष्ट्रात सर्वाधिक 242 गुन्हे घडले. त्यामध्ये 5.2 कोटी रुपये लुटले गेले होते.

सर्वाधिक घोटाळे राज्य गुन्हे – लूट
महाराष्ट्र – 233 4.8 कोटी
दिल्ली – 179 2.9 कोटी
तामीळनाडू – 147 3.6 कोटी
कर्नाटक – 65 1.3 कोटी
हरयाणा – 58 1.1 कोटी

भुसावळ येथे एटीएम फोडले

भुसावळ तालुक्यातील कुऱहोपानाचे येथे आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरटय़ांनी गॅस कटरच्या सहाय्याने तोडले. त्यातील साडेनऊ लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली.

आपली प्रतिक्रिया द्या