महाराष्ट्र पोलीस दलातर्फे फिट इंडियासाठी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

178
maharashtra-police2

स्वस्थ आणि तंदुरुस्त हिंदुस्थान या मोहिमेअंतर्गत येत्या 9 फेब्वारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे मुंबईत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये पाच हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी धावणार आहेत तर देशातील ज्यांना कोणाला मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी नक्की यावे असे आवाहन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांनी केले आहे.

‘तंदुरुस्त भारत-फिट इंडिया’ या देशभर सुरू झालेल्या चळवळीचा भाग म्हणून मुंबईत पोलीस दलातर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस दलाचे आरोग्य आणि युवा पिढीचा आरोग्याकडे सकारात्मक दृष्टिकोन वाढावा हा मॅरेथॉन आयोजन करण्यामागचा हेतू असल्याचे जायसवाल यांनी सांगितले. पोलीस दलातील आयरमॅन व अल्ट्रामॅन, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश हे या मॅरेथॉनच्या आयोजनाचे कामकाज पाहत आहेत. मॅरेथॉनपूर्वी तंदुरुस्तीचे व्यायाम, सराव व क्रीडाप्रकार करताना कुणालाही इजा, दुखापत होऊ नये यासाठी पोलीस दलाकडून देशभरातील दोन हजार फिजिओथेरेपिस्ट तसेच 300 होमिओपॅथिस्ट, आहारतज्ञ यांची सेवा मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र पोलिस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन या साइटवर लॉग इन करावे.

आपली प्रतिक्रिया द्या