महाराष्ट्राच्या दहा पोलिसांना विशेष शोध पुरस्कार

2038

देशातील 121 पोलिसांना केंद्र सरकारने खूषखबर दिली आहे. क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा गुन्हा कौशल्यपूर्ण पद्धतीने उघडकीस आणणाऱ्या या अधिकाNयांना उत्कृष्ट तपासाकरिता विशेष पुरस्कार गृहमंत्रालयाने जाहीर केला आहे. यात राज्यातील दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गुन्ह्याचा चांगल्या पद्धतीने तपास करून पीडितांना न्याय आणि गुन्हेगारांना शासन व्हावे. तपासाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी अधिकाNयांना प्रोत्साहन मिळावे याकरिता गृहमंत्रालयाने उत्कृष्ट तपास पुरस्कार देण्यास सुरुवात केली. यंदा राज्यातील पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, एसीपी शिवाजी पंडितराव पवार, एसीपी समीर शेख, एसीपी किसन गवळी, एसडीपीओ नारायण शिरगावकर, एसडीपीओ अनिल घेरडीकर वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र हिवरे, पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे हे मानकरी ठरले आहेत.

देशातील 121 पोलिसांना पदके

देशातील एकूण 121 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे. त्यात महाराष्ट्रातील 10, मध्य प्रदेशचे 9, सीबीआयचे 14, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे 5, राष्ट्रीय तपास पथक (एनआयए)च्या 5 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

उत्तम सोनावणे हे रेल्वे पोलीस दलात गुन्हे शााखेचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोन वर्षांपूर्वी दादर-भुज एक्स्प्रेसमध्ये महिलेची हत्या झाली होती. उत्तम सोनावणे यांच्या पथकातील पोलिसांनी कौशल्याचा वापर करून एका आरोपीला जानेवारी महिन्यात अटक केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या