तुला 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते! प्रियांकाला महाराष्ट्र पोलिसांनी बजावले

गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत कम बॅक केले आहे. ‘द स्काय इज पिंक (The Sky Is Pink)’ या चित्रपटातून ती झळकणार आहे. पण याच चित्रपटातील एका डायलॉगमुळे महाराष्ट्र पोलिसांनी तिला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते असे बजावून सांगितले आहे. त्यानंतर आपली चूक लक्षात येताच प्रियांकाने ‘ट्वीट’मधून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला. प्रेक्षकांनाही तो भावला. त्यामुळे टि्वटरवर वर्ल्डवाइड ट्रेंडिंग मध्येही हा ट्रेलर चमकला. मात्र या ट्रेलरमध्ये एक दृश्य आहे ज्यात जावेद अख्तर प्रियांकाला म्हणतो की ‘ आदिती एक दिवस असा येईल की मी इतका पैसा कमवेल की या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याचीही गरज नसेल. यावर प्रियांका त्याला म्हणते की आयशा बरी झाली की आपण एकत्र बँक लुटूया’. ट्रेलरमधील याच डायलॉगवरून महाराष्ट्र पोलिसांनी टि्वट केले आहे. ज्यात प्रियाकांला भारतीय दंड विधान कलम 393 अंतर्गत 7 वर्षांची शिक्षा व दंडही होऊ शकते असे बजावण्यात आले आहे.

यावर प्रियांकाने ‘Oops… मी रंगेहात पकडले गेले… मला वाटत प्लान बी वापरावा लागेल’, असे रिटि्वट करत महाराष्ट्र पोलिसांचे टिे्वट सहकलाकार फरहान अख्तरला टॅग केले आहे.

11 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘मोटीव्हेशनल स्पीकर’ आयशा चौधरी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. आयशा पल्मनरी फायबरोसिस (Pulmonary Fibrosis) या विकाराने ग्रस्त होत्या. त्यांची ही भूमिका प्रियांका रंगवणार आहे. तसेच फरहान अख्तर, रोहीत सराफ, जायरा वसिम यात झळकणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या