#MaharashtraPolitics महाराष्ट्राच्या सत्तापेचावर शहांची पहिली प्रतिक्रिया

12339

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले तरी कोणताही पक्ष सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमत सिद्ध करू शकला नाही. यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. या शिफारसीवर कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर सोमवारपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडीवर भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Live – काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत दाखल

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना शहा म्हणाले की, ‘निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी 18 दिवसांचा वेळ देण्यात आला. एवढा वेळ यापूर्वी कोणत्याही राज्याला देण्यात आला नव्हता. विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यपालांनी विविध पक्षांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आम्हीही आवश्यक संख्याबळ जमवू शकलो नाही. आजही कोणत्याही पक्षाकडे बहुमतासाठीचा 145 हा आकडा असेल तर त्यांनी सत्तास्थापनेसाठी राज्यपालांची भेट घ्यावी.’

राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने भाजपचे नुकसान झाले आहे. यामुळे भाजपचे काळजीवाहू सरकारही गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायउतार व्हावे लागले, अशी प्रतिक्रिया शहा यांनी दिली. तसेच सरकार स्थापन करण्याचा पर्याय सर्वासाठी खुला असून कोणाकडूनही संधी हिरावली नाही, असेही ते पुढे म्हणाले. तसेच मध्यावधी निवडणुका होऊ नये अशी माझी इच्छा आहे, असेही शहा यावेळी म्हणाले. 6 महिन्यानंतर राज्यपाल कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कारवाई करतील असेही शहा यांनी नमूद केले.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? वाचा सविस्तर एका क्लिकवर…

आपली प्रतिक्रिया द्या