Live -काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक

15583

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर देखील विविध पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. राष्ट्रपती राजवट घालवून सत्तास्थापनेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे प्रयत्न सर्व पक्षांकडून सुरू आहेत. या राजकीय घडामोडींचे सर्व अपडेट येथे वाचायला मिळतील. 

 • अजित पवार, जयंत पाटीस, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित
 • काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्यव समितीची बैठक सुरू

 • अजित पवार माझ्यासोबतच आहेत – जयंत पाटील
 • अजित पवार मुंबईतच आहेत – शरद पवार
 • अजित पवार बारामतीकडे रवाना
 • बैठक कधी होईल माहिती नाही – अजित पवार
 • प्रमुख नेते हजर असूनही बैठक रद्द करण्यात आली
 • काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वयक समितीची बैठक ऐनवेळी रद्द, ‘एबीपी माझा’ने दिली माहिती

#MaharashtraPolitics महाराष्ट्राच्या सत्तापेचावर शहांची पहिली प्रतिक्रिया

 • काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत दाखल
 • सत्तास्थापनेसाठी  फक्त 24 तास देणं चुकीचं – मल्लिकार्जुन खरगे
 • लवकरच आम्ही निर्णय घेऊ – बाळासाहेब थोरात
 • काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा एकत्र बसून चर्चा करू व त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा होऊ शकते
 • आम्ही उद्धवजी ठाकरेेना भेटलो ही सदिच्छा भेट होती – बाळासाहेब थोरात
 • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांमध्ये चर्चा झाली. – बाळासाहेब थोरात
 • ट्रायडंटमध्ये काँग्रेस नेते व शिवसेना सचवि मिलिंग नार्वेकर यांच्यात बैठक सुरू
 • चर्चा योग्य दिशेने सुरू, लवकरच निर्णय घेऊ – उद्धव ठाकरे
 • उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांमधील बैठक संपली
 • अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे बैठकीला उपस्थित
 • उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू
 • काँग्रेस नेते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ट्रायडंट हॉटेलला पोहोचले.
 • मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, रुग्णालयातून बाहेर पडल्यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
 • संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
 • अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे उपस्थित

 • काँग्रेस नेत्यांनी घेतली संजय राऊत यांची लिलावतीमध्ये भेट
 • जर एखादा आमदार फुटला तर आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ. आणि मग कोण माय का लाल असेल तरी तो जिंकू शकणार नाही – अजित पवार
 • अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित
 • राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली आमदारांसोबत बैठक सुरू
आपली प्रतिक्रिया द्या