#MaharashtraPolitics काँग्रेस-राष्ट्रवादीची खलबतं, मुंबईत संयुक्त बैठक

812

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच 19 व्या दिवशीही कायम आहे. सोमवारी राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला राजभवनावर बोलावून सत्तास्थापनेचा दावा करण्याचे निमंत्रण दिले. यानंतर मंगळवारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकांचा सपाटा सुरू झाला. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ मंगळवारी राज्यात दाखल झाले. या शिष्टमंडळाचे आणि राष्ट्रवादी नेत्यांची बैठक वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये सध्या सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, के.सी वेनुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य बडे नेते सहभागी झाले आहेत. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

तत्पूर्वी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मुदत दिली होती. त्याप्रमाणे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सायंकाळी 7 वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेची इच्छा व्यक्त केली आणि संख्याबळ दाखवण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली, मात्र राज्यपालांनी मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला राजभवनावर बोलावून सत्तास्थापनेचा दावा करण्याचे निमंत्रण दिले असून त्यासाठी 24 तासांची मुदत दिली आहे. ही मूदत पूर्ण होण्यापूर्वीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींची मोहोर

आपली प्रतिक्रिया द्या