राज्यातील 17 हजार कैदी मुक्त करणार – गृहमंत्री

anil-deshmukh

राज्यात कारागृहातील कैद्यांना होत असलेली कोरोनाची बाधा लक्षात घेऊन आठ कारागृह पूर्णतः लॉकडाऊन केले आहेत. या ठिकाणी कुणीही बाहेरचा व्यक्ती जाऊ शकणार नाही आणि आतमधील व्यक्ती बाहेर जाणार नाही, अशी व्यवस्था केली. सध्या राज्यातील 60 कारागृहांमध्ये 38 हजार कैदी आहेत. कोरोनाची भीती आणि लागण लक्षात घेता सोशल डिस्टन्स पाळता यावं म्हणून 38 हजारांपैकी 17 हजार अंडर ट्रायल कैदी तात्पुरते मुक्त केले जात आहेत. यातीळ दहा हजार कैदी आतापर्यंत सोडण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या