‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीझरने वाढवली उत्कंठता   

जय जय महाराष्ट्र माझा…’ हे अजरामर महाराष्ट्र गीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर सोमवारी शाहीरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त लॉन्च करण्यात आला. बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे पार पडलेल्या सोहळय़ात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते टीझरचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी शाहीरांच्या पत्नी राधाबाई साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, संगीत-दिग्दर्शक अजय-अतुल आणि अंकुश चौधरी, सना शिंदे आदी कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते. येत्या 28 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.