तंत्रशिक्षण पदविकेचे शैक्षणिक वर्ष 31 मेपर्यंत पूर्ण करा; तंत्रशिक्षण मंडळाच्या सूचना

तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष 31 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना तंत्रशिक्षण मंडळाने सर्व शिक्षण संस्थांना दिले आहेत. सुट्टीच्या दिवशी जादा तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करून 30 जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेशही मंडळाने दिले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठ कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीदरम्यान नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा व शैक्षणिक शिस्त यांचे नियोजन आणि महाविद्यालयांच्या परीक्षा व त्यांचे निकाल, सीईटी तसेच वार्षिक प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करणे, अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

बैठकीमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार मंडळाने व राज्यातील पदविका अभ्यासक्रमाच्या स्वायत्त संस्थांनी पदविका अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष परीक्षा 31 मे 2023 पर्यंत पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करण्याचे सुचविण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्ष 24 जुलैपासून सुरू होणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी जाहीर केले आहे.

परीक्षांचे वेळापत्रक

 प्रात्यक्षिक परीक्षा – 7 ते 14 मे

द्वितीय सत्र परीक्षा – 26 ते 28 एप्रिल

प्रथम वर्ष फार्मसी – 26 डिसेंबर 2022 ते 6 मे 2023

प्रथम सत्र परीक्षा – 6 ते 10 फेब्रुवारी

द्वितीय सत्र परीक्षा – 3 ते 7 एप्रिल

तृतीय सत्र परीक्षा – 24 ते 28 एप्रिल

द्वितीय वर्ष फार्मसी – 26 डिसेंबर 2022    ते 6 मे 2023

द्वितीय सत्र परीक्षा – 20 ते 24 फेब्रुवारी

तृतीय सत्र परीक्षा – 24 ते 28 एप्रिल

 असे असेल सत्र वेळापत्रक

दुसरे, चौथे, सहावे, आठवे सत्र – फेब्रुवारी  ते 6 मे

प्रथम सत्र परीक्षा – 15 ते 17 मार्च

द्वितीय सत्र परीक्षा – 26 ते 28 एप्रिल

वार्षिक पॅटर्न –  6 मे 2023 पर्यंत