भक्ती खामकरला दुहेरी मुकुट; राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा

388

महिलांच्या 50 मीटर प्रोन प्रकारात ज्युनियर राष्ट्रीय विजेत्या 18 वर्षीय भक्ती खामकरने दोन सुवर्णपदकांसह 36 व्या राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. तिने महिला तसेच ज्युनियर गटात ही सुवर्णपदके जिंकली. मुंबई शहरच्या या खेळाडूने 600 पैकी 594 गुणांची कमाई केली. पुरुष गटातील विजेत्या खेळाडूच्या गुणांशीही तिने बरोबरी केली. वरळी येथील महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरच्या इंद्रजीत मोहितेने 594 गुणांसह विजेतेपद पटकावले. रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले आणि मुंबईच्या विश्वजित शिंदे यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदके जिंकली.

निकाल

  • 50 मीटर प्रोन (महिला) – 1) भक्ती खामकर (मुंबई शहर; 594), 2) राखी सामंत (मुंबई शहर; 583), 3) स्नेहल पाटील (पुणे; 583).
  • 50 मीटर प्रोन (ज्युनियर) – 1) भक्ती खामकर (मुंबई शहर; 594), 2) प्रणाली सूर्यवंशी (पुणे; 574), 3) याशिका शिंदे (मुंबई शहर; 573).
  • 50 मीटर प्रोन (पुरुष) – 1) इंद्रजीत मोहिते (कोल्हापूर; 594), 2) पुष्कराज इंगोले (रत्नागिरी; 587), 3) विश्वजित शिंदे (मुंबई शहर; 583).
आपली प्रतिक्रिया द्या