महिला आयोगाकडून धनंजय मुंडेंच्या वक्तव्याची दखल, लवकरच कारवाई होणार

2769

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. या प्रकरणी राज्याच्या महिला आयोगाने दखल घेतली आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुमोटोही दाखल केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी  एका सभेत पंकजा मुंडे यांच्या विरोधात बीभत्स भाषेत टिप्पणी केली. या प्रकरणी पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी धनंजय मुंडे यांचे वक्तव्य अशोभनीय असल्याचे म्हटले आहे. तसेच मुंडे यांचे वाक्य हे महिलांना लाजवेल असे आहे. त्यांची सुमोटो दखल घेतली आहे. मुंडेंवर कारवाई होईल. थांबा आणि वाट पहा असेही रहाटकर म्हणाल्या.

पंकजा मुंडेवर गलिच्छ व बिभत्स भाषेत टीका, धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

आपली प्रतिक्रिया द्या