विधानपरिषद निवडणुकीसाठी 13 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

886

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये 13 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण 14 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले होते.

नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे – 

  • उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)
  • नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना)
  • शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
  • मोल रामकृष्ण मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
  • किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
  • शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
  • राजेश धोंडीराम राठोड (भा.रा.काँ.)
  • गोपीचंद कुंडलिक पडळकर (भाजपा)
  • प्रवीण प्रभाकरराव दटके (भाजपा)
  • रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील (भाजपा)
  • अजित माधवराव गोपचडे (भाजप)
  • संदीप सुरेश लेले (भाजप)
  • रमेश काशिराम कराड (भाजप)

नामनिर्देशनपत्र अवैध ठरलेल्या उमेदवाराचे नाव आणि पक्षाचे नाव पुढीलप्रमाणे –

  • राठोड शेहबाज अलाउद्दीन (अपक्ष)

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 14 मे 2020 आहे.

आपली प्रतिक्रिया द्या