…सध्याचे गोडसे गांधींचा हिंदुस्थान संपवत आहेत; ओवेसी पुन्हा बरळले

646

ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. ‘गोडसे यांनी गांधींना गोळ्या घातल्या होत्या, मात्र सध्याचे गोडसे गांधींचा हिंदुस्थान संपवत आहेत’, असं नाव न घेता ओवेसी बरळले आहे. ‘गांधींवर विश्वास असणार्‍यांना मी आवाहान करतो की, गांधींच्या देशाला वाचावा’, असेही असदुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत. गांधी जयंतीनिमित्त संभाजीनगर येथे आयोजित एका सभेत ते बोलत होते.

ओवेसी पुढे म्हणाले की, ‘सध्याचे शासक गोडसेला आपला नायक मानतात. गोडसे यांनी गांधींची तीन गोळ्या झाडून हत्या केली होती. मात्र आता रोज अनेक लोकांची हत्या होत आहे,’ तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, गांधींना शेतकऱ्यांची काळजी होती. मात्र आज शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्याचे सरकार यावर काय करत आहे?’ असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एमआयएमने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीसोबत युती तोडली असून एमआयएम स्वबळावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उतरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या