महाराष्ट्रातील फळे व त्यांचे फायदे भाग-२

10121

dr-namrata-bharambeब्लॉग: आहार-विहार

>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे

गेल्या आठवड्यात बाजारात मिळणाऱ्या फळांचे गुणधर्म आणि त्याचे फायदे आपण जाणून घेतले. त्याचाच दुसरा भाग ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. तुमचे प्रश्न असतील तर ते ही आमच्या पर्यंत पोहोचवा.

dalimb-pomogranate७. डाळींब – भारत देश हा जगात डाळींब उत्पादक देशामध्ये मुख्य देश आहे. भारतात महाराष्ट्र हे डाळींब उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. डाळींब हे फळ त्याच असणाऱया भरपूर बियांमुळे जास्त फायद्याचे ठरते. कारण या बिया खाण्यास योग्य (edible) असतात. बियांमध्ये खूप महत्त्वाचे असे dietary fibre असतात ज्यामुळे पोट साफ न होणे, फुगारा अशा तक्रारी दूर होतात. तसेच डाळींबामध्ये असणारे punicic acid व punicalagins हे घटक anti inflammatory म्हणजेच सूज कमी करतात. म्हणून डाळींब हे तोंड येणे, हिरड्या सुजणे, ह्रदयरोग, सांध्यांचे दुखणे अशा विकारांमध्ये देखील फायद्याचे ठरते.

sugarcane-new८. ऊस- महाराष्ट्रात नगर जिल्हा व आसपासचा परिसर हा ऊस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. आयुर्वेदामध्ये ऊसाच्या रसाचे फायदे वर्णन केले आहेत. फळांचे रस शरीरासाठी उपयुक्त नसतात परंतु ऊसाचा रस याला अपवाद आहे. ऊसाचा रस हा शरीरात तत्काळ ताकद व स्फूर्ती निर्माण करतो. उन्हाळ्यात वारंवार लागणारी तहान शमविण्याचे कार्य उसाचा रस करतो तसेच शरीराला थंड ठेवतो. उसाच्या रसात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, लोह, मँगनीजचे प्रमाण जास्त असल्यामुळे उसाचा रस अल्कधर्मी होतो व मूत्रदाह, मूत्रमार्गाची जळजळ या लक्षणांना कमी करतो. उसाचा रस हा त्वचेसाठी पण उपयुक्त आहे. उसाचा रस चेहऱ्यावर लावल्यावर त्यात असणारे Glycolic acid त्वचेला instant glow देते.

chiku९. चिकू – महाराष्ट्रात ‘घोलवड’चे चिकू प्रसिद्ध आहे. चिकू हे फळ सालीसह खाऊ शकणारे फळ असून चिकूच्या सालींमध्येदेखील शरीरासाठी आवश्यक घटक असतात. ७-८ महिन्यांच्या बाळाला सहजपणे पचणारे असे चिकू हे फळ आहे. त्यातील गोडव्यामुळे मुले चिकू आवडीने खातात. महत्त्वाची पोषक द्रव्ये व कर्बोदकांमुळे चिकू हे गर्भिणींसाठी देखील महत्त्वाचे फळ आहे. गर्भारपणात वारंवार होणाऱ्या उलट्या अथवा मळमळ तसेच मरगळ यावर चिकूचा उपयोग चांगल्याप्रकारे होऊ शकतो. चिकूमध्ये ‘Tannin’ हे उत्कृष्ट प्रतीचे antioxidants असते जे Gastritis, Irritable bowel, acidity, Reflux esophagitis मध्ये आराम देते.

guava-fruit१०. पेरु – शिर्डी जवळील ‘रहाटा’ हे पेरुंसाठी प्रसिद्ध आहे. येथील जवळपास ३००० हेक्टर क्षेत्र पेरुंच्या बागांखाली आहे.
पेरुमध्ये असणारे खनिज फोलेट हे पुनरुत्पादनाची क्षमता वाढवते. पेरुमध्ये तांबे हे खनिज असते जे थायरऑईड ग्रंथीचा आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. पेरुंमध्ये असणारा lycopene हा घटक त्वचेचे अतिनील सूर्याकिरणांपासून तसेच प्रदूषणापासून बचाव करतो. मॅग्नेशिअम या खनिजाचे प्रमाण पेरुमध्ये मुबलक असते. त्यामुळे व्यायामानंतर पेरु फळ उत्तम असून Muscle व Nerve relaxant म्हणून काम करते व शरीराला ताकद देते.

sitafal-fruit११. सिताफळ – महाराष्ट्रातील पुणे-सासवड परिसरात सिताफळ प्रामुख्याने घेतले जाते. वजन वाढण्याची गरज असणाऱ्या व्यक्तींसाठी सिताफळ हे योग्य फळ आहे. सिताफळामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे अॅनेमिया (हिमोग्लोबिनची कमतरता) मध्ये सिताफळ फायदेशीर ठरते. सिताफळाला ‘Wondor fruit of pregnancy’ असे देखील म्हटले जाते कारण हंगामानुसार सिताफळाचे नियमित सेवन बाळाच्या योग्य वाढीसाठी उपयुक्त ठरते.

papaya-fruit१२. पपई – पपई हे महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारे फळ आहे. पपई मध्ये पॅपिन नावाचे एन्झाईम असते. पचनासंबंधी असणारे विकार पॅपिन दूर करते. तसेच पपई मध्ये असणारे Choline हे झोपेत शरीराची झीज भरुन काढतात. पपईमध्ये मुबलक असणारे Zeaxanthins व beta carotene हे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected]

फोन क्र. ९८२०२१५७९६

आपली प्रतिक्रिया द्या