#MaharshtraPolitics शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची समन्वय बैठक

1955

महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेचा पेच कायम असताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची समन्वय बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, गेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक सहभागी झाले.

shivsena-ncp

बैठक संपल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, किमान समान कार्यक्रम ठरवण्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. किमान समान कार्यक्रमावरच या बैठकीमध्ये चर्चा झाली. बैठकीतल्या चर्चेचा तपळील दिल्ली हायकमांडला पाठवण्यात येईल. ड्राफ्ट हायकमांड फायनल करणार. तसेच काँग्रेसची मुख्यमंत्रीपदाची मागणी नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, दुसरीकडे गुरुवारी सायंकाळी भाजप कार्यकारिणीची बैठक होत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या