आमिर, शाहरूखसह प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्रींचे ‘सेल्फी विथ पीएम’

607

150 व्या गांधी जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपट व कलाविश्वातील दिग्गजांशी संवाद साधला. लोककल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानी मोदींनी हा संवाद साधला. यावेळी बॉलिवूड स्टार शाहरूख खान, आमिर खान, सोनम कपूर, कंपना रनौत, जॅकलिन फर्मांडिस, इम्तियाज अली, एकता कपूर, अनुराग बसू यांच्यासह अनेक प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्मात्यांची उपस्थिती होती.

पंतप्रधान मोदी यांनी कलाविश्वातील दिग्गजांशी संवाद साधताना गांधीजींच्या साधेपणाचे आणि त्यांच्या विचारांचे गोडवे गायले. महात्मा गांधी यांच्या आदर्शांवर आणि तत्वांना लोकप्रिय बनवण्यासाठी चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील लोकांनी चांगले काम केल्याचेही मोदी म्हणाले. तसेच मोदींनी यावेळी सर्व कलाकारांना दांडीमध्ये बनवलेल्या संग्रहालयाचा आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचा दौरा करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, मोदींच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहात होता. यावेळी शाहरूख, आमिर, जॅकलिन यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी काढण्याची हौसही पूर्ण करून घेतली. तसेच आमिर खान आणि शाहरूख यांनी सोशल मीडियावर मोदींसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांच्या कार्याला सलामही केला.

आपली प्रतिक्रिया द्या