अमेरिकेत आंदोलकांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

1378

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील हिंदुस्थानी दुतावासाबाहेर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची जॉर्ज फ्लॉयडसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी विटंबना केली आहे. एएनआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अमेरिकेच्या मिनिसोटे प्रांतात कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड याची पोलिसांनी हत्या केली. एकापेक्षा जास्त जणांनी फ्लॉयडला मारहाण केली तसेच त्याचा गळा दाबला, असे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. 26 मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर अमेरिकेत हिंसाचाराचा भडका उडाला आहे. वॉशिंग्टन, डल्लास, ह्युस्टन, अटलांटा, कॅलिफोर्निया आदी 140 शहरांमध्ये दंगलखोरांनी उत्पात माजवला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली. बऱ्याच ठिकाणी जमावाच्या रोषाला पोलीस बळी पडले. यात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले आहेत. सोमवारी व्हाईट हाऊससमोर आंदोलन करणारे आंदोलक अत्यंत आक्रमक झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला होता.

आपली प्रतिक्रिया द्या