कर्जाची चिंता मिटली, आता लेकीच्या लग्नाला या! सरकारच्या कर्जमुक्तीने बळीराजा सुखावला

1275

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी सोमवार जाहीर करण्यात आली. या पहिल्याच यादीत 15 हजार 358 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून कर्जमुक्तीचे पैसे थेट या शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. सरकारच्या या कर्जमुक्तीने बळीराजा सुखावला असून परभणी जिह्यातील एका शेतकऱयाने आभार मानताना साहेब, आता कर्जाची चिंता मिटली. लेकीच्या लग्नाला या, असे निमंत्रणच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कर्जमुक्त शेतकऱयांची पहिली यादी जाहीर होईल अशी घोषणा केली. या घोषणेनुसार आज कर्जमुक्त शेतकऱयांची पहिली यादी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धक ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर, परभणी, अमराकती क पुणे जिल्हय़ातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्हय़ांतील दोन पात्र लाभार्थी शेतकऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यामुळे शेतकरी राजा सुखावला असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. विधान भवनात झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री दिवाकर रावते, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

35 दिवसांमध्ये 35 लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा

योजनेंतर्गत 34 लाख 83 हजार 908 शेतकरी खात्यांची माहिती प्राप्त झाली आहे. आज 15 हजार 358 शेतकऱयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. योजनेंतर्गत 35 दिवसांमध्ये 35 लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. तसेच 15 दिवसांच्या आत या माहितीचे लेखापरीक्षण झाले आहे. या योजनेची सर्व अंमलबजावणी संगणकीय पद्धतीने होत आहे. शेतकऱयांच्या मान्यतेनंतरच कर्जमुक्तीची रक्कम खात्यात जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणानंतर शेतकऱयाला नोंद पावती दिली जात आहे.

आशीर्वादाच्या अक्षता टाकायला या!

परभणीच्या पिंगळी येथील विठ्ठलराव गरूड यांनी कर्जमुक्तीची रक्कम मिळणार असल्याने चिंता मिटल्याची भावना व्यक्त केली आणि मुलीच लग्न जमलेय अशी आनंदाची बातमी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलीला कुठं दिलं अशी आपुलकीची विचारपूस करतानाच लेकीला आणि जावयाला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. हा संवाद ऐकताना हरखून गेलेल्या विठ्ठलराव यांनी लगोलग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मुलीच्या लग्नाचे आमंत्रणही दिले. एवढेच नव्हे तर साहेब, लग्नाला नक्की या. आशीर्वादाच्या अक्षता टाकायला या. आम्ही तुमची वाट पाहतो, असे गरूड म्हणाले.

अंगठा दाखवताच काम झालं!

या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का… किती हेलपाटे मारावे लागले, किती कर्ज होते, कुठल्या पिकाला कर्ज घेतले होते, आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला अशी विचारपूस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना केली. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना नगर जिह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त करताना ‘मागील वेळेस पाच ते सहा वेळा चकरा माराव्या लागल्या. आता केवळ एका थम्बवरच काम झाले’ असे त्यांनी सांगितले. यावेळी अमरावती येथील सुरेश कोटेकर, सरिता गाढके, बाबाराव दामोदर यांच्याशीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संवेद साधला.

60 दिवसांत अंमलबजावणी, यशाचे श्रेय यंत्रणेला – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील बळीराजाला कर्जमुक्त, चिंतामुक्त करणाऱया या मोठय़ा योजनेची अंमलबजाकणी केवळ 60 दिवसांत झाली असे सांगून, याचे श्रेय यंत्रणेला असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी अंमलबजावणी करताना उणिवा जाणवल्या, तर शेतकऱयांनी नाराज होऊ नये असे सांगतानाच शेतकऱयांचे प्रश्न समजून घेताना संयम ढळू देऊ नका, बळीराजाला दुखकू नका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला केल्या.

बळीराजाला काळय़ा आईची सेवा करता यावी यासाठी योजना – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बळीराजा कर्जमुक्त व्हावा याच भावनेतून ही योजना सुरू केली. कर्जमुक्त होऊन शेतकऱयाला पुन्हा काळय़ा आईची सेवा करता यावी, शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे, शेतकरी आनंदात राहावा, त्याच्या मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

68 गावांतील शेतकऱयांची यादी जाहीर

सुरुकातीच्या टप्प्यात प्रत्येक जिह्यातील दोन गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. याची अंमलबजाकणी कशा पद्धतीने होते हे पाहून कर्जमाफीची पुढील यादी प्रसिद्ध होईल. मात्र मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजाकणी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार आज 68 गावांतील शेतकऱयांची यादी जाहीर करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत एकूण 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे.

मागील आठकडय़ात आकस्मिकता निधीची मर्यादा 150 कोटींकरून 10 हजार कोटी करण्यात आली होती. कर्जमाफीसाठी ही रक्कम कापरण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जमुक्तीसाठी आता एकूण 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या