पुणे शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. एकीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात कुठेतरी महिलांवर अत्याचार सुरू असताना राज्यातील सरकार मात्र स्वतःची जाहिरात करण्यात मग्न आहे. त्यामुळे सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेबाबत जाब विचारण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने मंगळवारी तीव्र आंदोलन केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भर आंदोलनात ‘सामना’ झळकावून सरकारचा खडसून समाचार घेतला.
(फोटो – चंद्रकांत पालकर )