महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद, वाचा ठळक मुद्दे

10670

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी नरिमन पॉईंट येथील ‘शिवालय’ येथे बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला मंत्री अनिल परब, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी ‘आमची मानसिकता ढळू देणार नाही. महाराष्ट्र कोरोनामुक्त करणार आणि फडणवीसांच्या प्रश्नांना उत्तर देऊ’, असे तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे –

अनिल परब –

  • देवेंद्र फडणवीस यांच्या आभासी पत्रकार परिषदेला प्रत्यक्ष उत्तर देत आहोत
  • विरोधीपक्षाने उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्राकडून मदत आणून दिली असती, तर आम्ही अभिनंदन केलं असतं
  • 1750 कोटी रुपयांचा गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही, 122 कोटी स्थलांतरित मजुरांसाठी दिलेले नाही
  • महाराष्ट्रातून 600 श्रमिक ट्रेन सुटल्या, या सर्व ट्रेनचा खर्च महाराष्ट्र सरकारने दिले आहे, कोणत्याही श्रमिकाकडून पैसे घेतलेले नाही
  • एका ट्रेनला 50 लाख खर्च कुठून येतो याचा हिशोब विरोधीपक्षाकडून घ्या
  • महाराष्ट्रापेक्षा लहान गुजरात राज्याला जास्त ट्रेन, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न
  • महाराष्ट्र सरकारचे हक्काचे 18 हजार कोटी आम्हाला मिळालेले नाही
  • कायद्यात नसलेले देऊ नका, जे कायद्यात बसतात ते पैसे तरी द्या
  • 9 हजार कोटी कापूस, धान, चणा-मका अशा शेतमाल खरेदीसाठी दिल्याचा दावा खोटा
  • मजुरांच्या छावण्यांसाठी 1611 कोटी दिल्याचे सांगितले, दरवर्षी 4600 कोटी आपत्ती व्यवस्थापनाचे मिळतात, हे त्यातलेच पैसे, वेगळे दिलेले नाही

जयंत पाटील –

  • राज्य सरकार सध्या कोरोना या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे
  • ही सरकार पाडण्याची नाही, सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ, जयंत पाटील यांचा भाजपला टोला
  • देशात सर्वाधिक चांगल्या पद्धतीने मुंबईत परिस्थिती हाताळली गेली आहे
  • WHO ने एप्रिल अखेर मुंबईत लाखांच्यावर रुग्ण असतील असे सांगितले, मात्र रुग्ण संख्या नियंत्रणात
  • भाजप महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू? फडणवीस यांचे हे वागणे आम्ही विसरणार नाही
  • कोरोना संकटात गुजरातपेक्षा महाराष्ट्रची स्थिती चांगली
  • भाजप सध्याच्या वागण्यामुळे जनतेच्या मनातून कायमची उतरली

बाळासाहेब थोरात –

  • राज्यात कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्रित काम सुरू
  • जे पायी जात होते त्यांचीही काळजी घेतली गेली, बसेसने त्यांची सोय केली. कार्यकर्तेही मदत करत आहेत
  • विरोधीपक्ष सहकार्य करण्याऐवजी वेगळी मोहीम उघडून गोंधळ निर्माण करत आहे
  • आम्ही या कोरोनाचा सामना नक्की करु आणि महाराष्ट्राला कोरोनातून बाहेर काढू
आपली प्रतिक्रिया द्या