गोव्यात महायुतीचाच मुख्यमंत्री होणार – शिवसेना

17

सामना ऑनलाईन । पणजी

गोवा विधानसभा निवडणूकीत महायुतीला जोरदार यश मिळेल आणि महायुतीचे सुदिन ढवळीकर हेच मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास शिवेसना नेते खासदार संजय राऊत यांनी येथे व्यक्त केला. गोवा शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होता. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला दिल्लीतून उमेदवार आयात करावा लागणार नाही, असा टोलाही  राऊत यांनी यावेळी लगावला.

येत्या २९  आणि ३० जानेवारीला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे करणार गोवा राज्यात रोड शो करतील. त्यानंतर ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी महायुतीच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार गोव्यात प्रचारासाछी येतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिली.

गाजावाजा करून गोव्यातील विधानसभा निवडणूकीत उतरणाऱ्या आम आदमी पार्टीला गोव्यात यश मिळणार नाही.  गोव्यात आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एल्विस गोम्स पराभूत होणार आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

पंजाबच्या निवडणूकीत आप सत्तेवर आल्यास अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होणार याबाबतच्या वृत्तावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, आम आदमी पार्टीचे अरविद केजरीवाल यांनी दिल्लीत थांबून दिल्लीतील समस्या सोडवायला हव्यात.

आपली प्रतिक्रिया द्या