आयपीएल 2025 च्या आधी मुंबई इंडियन्सने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संघाने पुन्हा एकदा महेला जयवर्धनेवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. जयवर्धनेला मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. जयवर्धने याने यापूर्वीही 2017 ते 2022 या काळात मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्विकारला होता. मात्र यानंतर जयवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांची प्रशिक्षकपदासाठी निवड करण्यात आली आहे.
2023 आणि 2024 च्या काळात मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर हे होते. मात्र आता त्याची जागा जयवर्धने घेणार आहेत. जयवर्धनेचा प्रशिक्षक म्हणून चांगला रेकॉर्ड आहे. जयवर्धनेच्या उपस्थितीत मुंबईने 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यानंतर 2022 मध्ये मुंबईने जयवर्धनेकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याला क्रिकेटचे ग्लोबल हेड बनवण्यात आले. या काळात त्याने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सलाही मदत केली.
आयपीएल 2024 हा काळ मुंबई इंडियन्ससाठी संघर्षाचा होता. सुरूवातीला संघाने रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवले. यानंतर रोहितच्या जागी हार्दिक पांड्याकडे कमान सोपवण्यात आली होती. मात्र हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात चांगली कामगिरी झाली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकाची धूरा महेला जयवर्धने याच्याकडे सोपवण्यात आली आहे.