धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द, असा आहे स्वप्नवत प्रवास

2073

टीम इंडियाचा माजी कर्णधार ‘फिनिशर’ महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. 2004 साली धोनी बांगलादेशविरुद्ध पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय लढतीसाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात टीम इंडियाची कमान धोनीच्या हाती आली. यानंतर टीम इंडियाने एक दिवसीय वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली व आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकण्याचा मान धोनीने मिळवला.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये तो शेवटचा मैदानात उतरला होता. विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या लढतीत धोनी खेळला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत धोनीने एकाही मालिकेमध्ये भाग घेतलेला नाही कानी आज त्याने संन्यास जाहीर केला.

एकदा टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याने धोनी माझ्या कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे असे म्हटले होते. तर लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनीही, अंतिम श्वास घेण्यापूर्वी मी 2011 च्या वर्ल्डकपमध्ये फायनल लढतीत धोनीने मारलेला षटकार पाहण्याची इच्छा व्यक्त करेल असे म्हटले होते. यावरूनच धोनीच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.

dhoni

धोनीचा जलवा –

  • 2007 ला एक दिवसीय वर्ल्डकपमध्ये पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचे नेतृत्व धोनीकडे देण्यात आले.
  • धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 चा टी-20 वर्ल्डकप जिंकला.
  • 2008 मध्ये धोनीचा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
  • 2010 ला धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिका चषक जिंकला.
  • 2011 ला धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एक दिवसीय वर्ल्डकप जिंकला.
  • 2013 ला धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला.
  • 2015 ला आशिया चषक जिंकला.

कारकीर्द –
90 कसोटी – 6 शतकांसह 4876 धावा
350 वन डे – 10 शतकांसह 10773 धावा
98 टी-20 – 1617 धावा

आपली प्रतिक्रिया द्या