महेश बाबूचा अनोखा विक्रम!

836

बॉक्स ऑफीसवर चित्रपटाद्वारे कमाईचे नवनवीन विक्रम रचणारा दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने लॉकडाऊन दरम्यान थिएटर बंद असतानाही अनोखा विक्रम रचला आहे. सुपरस्टार महेश बाबूने रविवारी आपला 45वा वाढदिवस साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याने चाहत्यांना आपला वाढदिवस साधेपणाने आणि सामूहिक कार्यक्रमांचे आयोजन न करता साजरा करण्याचे आवाहन केले होते. चाहत्यांनीदेखील त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोशल मीडियावरून अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला. मग काय ट्वीटरवरून #HBDMaheshBabu हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. महेश बाबूला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी हा हॅशटॅग वापरून रविवारी दिवसभरात तब्बल 6 कोटी ट्किट्स केले आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणात बर्थडे ट्किट प्राप्त करणारा तो पहिलाच सेलिब्रेटी ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या