महेश भट यांचा 1 कोटीचा मानहानी दावा

अभिनेत्री लुव्हियाना लोधने चित्रपट निर्माते-दिग्दर्शक महेश भट आणि मुकेश भट यांच्यावर गंभीर आरोप केले असून याप्रकरणी भट यांनी हायकोर्टात लुव्हियाना विरोधात 1 कोटीचा मानहानी दावा दाखल केला आहे.

हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत पुढील आदेश येईपर्यंत भट विरोधात कोणतेही मानहानिकारक आणि निंदनीय विधान करू नका, असे आदेश दिले आहेत. अभिनेत्री लुव्हियाना लोधने 23 ऑक्टोबर रोजी एक इंटरह्यू इंस्टाग्रामवर पोस्ट केला या इंटरह्यूमध्ये महेश आणि मुकेश भट यांच्यावर गंभीर आरोप केले.

आपला नवरा सुमित सभरवाल हा भट यांचा पुतण्या असून तो बॉलीवूड वर्तुळातील ड्रग्ज आणि वेश्या व्यवसायात सामील आहे तसेच महेश भट्ट यांना या सर्व गोष्टींची माहिती आहेत एवढेच काय तर महेश भट बॉलीवूडमधील डॉन असून बॉलीवूडमधील ड्रग्ज साखळी चालविणाऱयापैकी भट एक असल्याचा आरोप तिने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या