मुलीच्या लग्नासाठीचे पैसे सढळ हाताने दान केले!

सामना ऑनलाईन । पुणे

नोटाबंदीच्या घोषणेनंतर ज्यांच्या घरात लग्नसोहळा आहे अशा लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कुणी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत तर कुणी फक्त चहा-लाडूवर पाहुण्यांचे स्वागत केले. पण पुण्यातील एका आयएएस अधिकाऱ्याने मात्र आपल्या मुलीच्या लग्नातून वाचलेले पैसे थेट मुख्यमंत्री मदत फंडात दिले आहेत.

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणचे आयुक्त महेश झगडे यांनी लग्नात वाचलेले २,११,१११ रुपये मुख्यमंत्री मदत फंडात दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती ट्विटरवरून दिली आणि कौतुकही केले.