तुझ्या आईवरही बलात्कार करेन, ट्रोलर्सच्या धमकीनंतर अभिनेत्रीची पोलिसांत धाव

2797

‘मुझसे शादी करोगे’ या रियालिटी शोमध्ये व्यक्त केलेल्या भावनामुळे माही विज आणि जय भानुशाली गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या शोमध्ये पारसने एका महिला कंटेस्टंटबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यात आणि पारसमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली होती. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केले होते. यावेळी एका युझरने त्यांची मुलगी तारा हिच्यावरही निशाणा साधला होता.

mahi-vij-jay-bhanushali

ट्रोलर्सच्या वादग्रस्त विधानामुळे भडकलेल्या माही हिने जोरदार प्रत्युत्तर दिले. माझ्या मुलीला यामध्ये खेचू नकोस. दम असेल तर समोर येऊन बोल, लांबून भुंकू नको. धिक्कार आहे तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर ज्यांनी तुझ्यासारख्या निच व्यक्तीला जन्म दिला, असे रोखठोक प्रत्युत्तर माहीने ट्रोलर्सला दिले होते. ‘स्पॉटबॉय’ने माहीला याबाबत विचारले असता तिने ही फक्त त्या ट्रोलर्सची गोष्ट नाही, तर आणखी एका तुझ्या आईवरही बलात्कार करेन अशी धमकी दिल्याचे सांगितले.

माही हिने या ट्रोलर्सलाही उत्तर देताना तुझ्याच हिंमत असेल तर ओशिवारा पोलीस स्थानकात येऊन भेट, असे उत्तर दिले. यानंतर दुसऱ्याच दिवशी माही विज ओशिवारा पोलीस स्थानकात पोहोचली आणि त्या ट्रोलर्सची वाट पाहात बसली. याबाबत तिने सांगितले की, मी ओशिवारा पोलीस स्थानकात त्या अज्ञात व्यक्तीची तासभर वाट पाहिली. तो येणार नाही हे माहिती होते आणि त्याने ट्विटही डिलिट केले होते.

mahi-vij-jay-bhanushali-1

…म्हणून तक्रार करू शकले नाही
आईवर बलात्काराची धमकी दिल्यानंतर त्याने ते ट्वीट डिलिट केले. यानंतरही तो मला ट्रोल करत होता, असेही माही विज हिने सांगितले. मी सायबर सेलकडे याची तक्रार करू शकले नाही, कारण त्याने त्याचे सर्व ट्वीट डिलिट केले होते. यावेळी संतापलेल्या माही विज हिने माझ्या मुलीला किंवा आईला इजा करण्याचा प्रयत्न केल्यास मी त्याची वाट लावून टाकेन, असेही म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या