श्रीलंकेची सत्ता दोन भावांच्या हातात; छोटा भाऊ राष्ट्रपती, मोठा पंतप्रधान

1366

श्रीलंकेमध्ये ‘भाई-भाई’ राज सुरू झाले आहे. गोटबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती बनल्यानंतर आता महिंद्रा राजपक्षे यांनी गुरुवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. महिंद्रा राजपक्षे हे गोटबाया राजपक्षे यांचे मोठे बंधू आहेत.

रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिंद्रा राजपक्षे यांनी आणि अन्य मंत्र्यांनी पद व गोपनियतेचे शपथ घेतली. विषेश म्हणजे श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच छोटा भाऊ राष्ट्रपदीपदावर आणि मोठा भाऊ पंतप्रधानपदावर कार्यरत असणार आहे.

श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी पंतप्रधानपदासाठी महिंद्रा राजपक्षे यांच्या नावाची घोषणा केली होती. महिंद्रा राजपक्षे यांना यांना 26 ऑक्टोबर, 2018 ला तात्कालिन राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांनी पंतप्रधानपदावर नियुक्त केले होतो आणि विक्रमसिंघे यांची हकालपट्टी केली होती. परंतु हा वाद न्यायालयात गेला आणि न्यायालयाने सिरिसेना यांचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आणि विक्रमसिंघे पुन्हा पंतप्रधानपदावर विराजमान झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या