म्हणून महुआ मोईत्रांनी नेसली ‘गुलाबी साडी’; तृणमूलकडून संसद टीव्हीवर टीका

Mahua-Moitra

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील भाषणापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी गुरुवारी संसद टीव्हीवर गंभीर आरोप केला, त्याच सोबत खिल्लीही उडवली.

त्या म्हणाल्या की त्यांनी गुलाबी रंगाची आणि हिरव्या काठाची साडी नेसली ती यासाठी की, ‘निर्लज्ज आणि पक्षपाती संसद टीव्ही माझ्या भाषणावेळी इतरत्र कॅमेरा फिरवणार नाही’.

महुआ मोइत्रा यांनी बुधवारी संसद टीव्ही सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणावेळी कॅमेरा कमी वेळ त्यांच्यावर ठेवत असल्याचा आरोप केला. त्यांनी असा दावा केला की संसद टीव्हीने अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान भाजपकडून बोलणाऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रित केलं आणि ही गोष्ट अत्यंत ‘लाजिरवाणी’ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.