माहूर-श्रीदत्तप्रभूचे निद्रास्थान

गुरुचरित्रात ‘मातापूर’ म्हणून ज्या स्थानाचा उल्लेख आलेला आहे, तेच हे स्थान. यास माहूरगड असेही संबोधतात. भगवान दत्तात्रेयांचे हे निद्रास्थान आहे. नित्य रात्री श्रीदत्तगुरु या ठिकाणी निवासास असतात अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठापैकी माहूर हे एक शक्तीपीठ होय. साक्षात जगदंबेचा रेणुकमातेच्या स्वरूपात येथे निवास आहे.

रेणुका ही दशावतारातील सहावा अवतार भगवान परशुराम यांची माता व तपोनिधी जमद्ग्निऋषींची महान पतिक्रता भार्या होय. माहूरक्षेत्राला श्रीदत्तात्रेय व श्रीरेणुकामाता यांच्या वास्तव्याने एक आगळेच माहात्म्य प्राप्त झाले आहे. हे स्थान अत्यंत जागृत असून अनेकांना अद्यापही अनुभव येतात. या ठिकाणी ‘ब्रह्मनाद’ ऐकू येतो असे भाविक सांगतात.

माहूरक्षेत्री असलेले दत्तमंदिर एका उंच पर्वतावर असून त्या स्थानास दत्तशिखर अथवा ‘शिखर’ म्हणून संबोधतात. माहूरगावापासून हे स्थान पाच मैल अंतरावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या