तब्बल 15 लाखांचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला अटक, हडपसर पोलिसांची कामगिरी

घरमालक आई-वडिलांना रूग्णालयात घेउन गेल्याची संधी साधून तब्बल 15 लाखांचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला हडपसर पोलिसांनी अटक केले. तिच्याकडून 28 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत. बंगारेव्वा चंद्रम हराळे (29, रा. चडचण, कर्नाटक) असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. याप्रकरणी विजय फराटे (33, रा. गाडीतळ, हडपसर ) यांनी फिर्याद दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी फिर्यादी विजय त्यांच्या आई-वडिलांना तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेले होते. त्यावेळी घरात काम करीत असलेली मोलकरीण बंगारेव्वा हराळे हिने 15 लाख रुपयांचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत असताना, संबंधित मोलकरीण कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये जाऊन पुन्हा पुण्यात आल्याची माहिती पोलीस शिपाई निखील पवार यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांना सापळा रचून बंगारेव्वाला ताब्यात घेतले. तिच्याकडून 15 लाख रुपये किंमतीचे 28 तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या