मुलायम, मायावती 24 वर्षांनी एकाच व्यासपीठावर

36

सामना ऑनलाईन। मैनपुरी

बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव हे सर्व मतभेद विसरून शुक्रवारी एकाच मंचावर आले. तब्बल 24 वर्षे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले हे दोघे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले.

मुलायम सिंह यांच्या प्रचारार्थ मैनपुरी येथे झालेल्या सभेत मायावतींनी हजेरी लावली. मायावती यांचे हे उपकार आपण आयुष्यभर विसरणार नाही अशा शब्दांत मुलायम सिंग यांनी मायावती यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना त्यांचा योग्य तो सन्मान राखण्याचे आवाहनही केले.

आपली प्रतिक्रिया द्या